विशेष महिला तपस पथक
About Us
अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष ,ची स्थापना २०२० साली सातारा जिल्ह्यात करण्यात आलेली असून ते स्थानिक गुन्हे शाखा येथे कार्यान्वित आहे.
अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष चे कामकाज पद्धती-
१. सातारा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामधील भादवीस ३६३ कालमाखालील दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा विशेष तपास अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष करते.
२. बालकामगार, भीक मागणारी लहान मुले यांचा शोध घेऊन त्यांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेणे त्यांचेवर कारवाई करणे.
३. परराज्यातून लहान मुलांचे वाहतूक करणाऱ्या टोळ्यांची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणे.
४. देहविक्री च्या उद्देशाने महिला / मुली / बालके यांची वाहतूक करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेणे व कारवाई करणे.
५. हॉटेल्स, लॉजेस चेक करून त्याठिकाणी गैरप्रकार होत असतील तर त्यांचेवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अन्वये कारवाई करण्यात येते.
६. महिला व समाज कल्याण विभाग, कामगार आयुक्त विभाग, महिला व बालकांसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्था यांचेशी समन्वय साधून लहान मुले व महिलांबाबत काम करणे .
७. निरीक्षण गृहामध्ये असणाऱ्या अनाथ बालकांच्या पालकांचा शोध घेणे.
८. कुंटणखाना, लॉजेस येथे वैश्याव्यवसाय चालत असेल तर त्याबाबत माहिती प्राप्त करून कारवाई करणे.